शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचालनलायाने (ED) कारवाई केलाी आहे. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईसंबंधी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी प्रताप सरनाईक विधानभवानात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलही भाष्य केलं.

“गेल्या आठवड्यात माझं हिरानंदानी येथील राहतं घर आणि मिरा रोड येथील २५० मीटरची जमीन अशा दोन मालमत्ता जप्त केल्यासंदर्भात मला आणि माझ्या कुटुंबाला नोटीस पाठवली आहे. नोटीस आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया मी पूर्ण करत आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून ईडीने केलेल्या कारवाईविरोधात मी ३० दिवसात कोर्टात अपील कऱणार आहे. कोर्ट जो निर्णय देईल त्याच्या अधीन राहून पुढील कारवाई होईल,” असं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

मोठी बातमी! ईडीचा पुन्हा एकदा प्रताप सरनाईकांना दणका; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

पुढे ते म्हणाले की, “२४ नोव्हेंबर २०२० रोजी माझ्यावर ईडीने कारवाई केली होती. राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना माझ्यावर झालेली ही पहिली कारवाई होती. त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली. अनेक लोकांनी मला तुमचं संपलेलं आहे का? असं विचारलं होतं. पण न्यायालयीन लढाई सुरु असल्याचं मी सांगितलं होतं. शिवसेनेचा प्रवक्ता असल्याने त्यावेळी कंगना आणि अर्णब यांच्यावर टाकलेला हक्कभंग आणि त्यानंतर झालेली ही कारवाई कदाचित केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षाची सुरुवात माझ्यापासून झाली असेल”.

अग्रलेख : प्रतापींचा प्रसाद!

“राज्यातील अनेक सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर कारवाई होत आहे. पण माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने भविष्यातही करेन. पण एनएसईएलचा फूल फॉर्म काय हेदेखील मी तपासत आहे,” असं प्रताप सरनाईक म्हणाले.

“ही न्यायलयीन प्रक्रिया असून गेल्या आठवड्यात मला जप्तीची नोटीस मिळाली होती. वस्तुस्थिती अधिकृतरित्या कळावी म्हणून मी आज येथे आलो आहे. हिरानंदानी इस्टेट येथील माझं राहतं घर. मीरा रोड येथील २५० मीटरची जमीन अशी ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस मला पाठवली आहे. याप्रकरणी कोर्टात दाद मागण्याचा मला हक्क आहे. भविष्यातही मी ईडीला सहकार्य करणार आहे,” असं प्रताप सरनाईकांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा २० नोव्हेंबर २०२० रोजी पहिल्यांदा माझ्यावर धाड पडली आणि कारवाईला सामोरं गेलो तेव्हाच मी केंद्र आणि राज्याच्या संघर्षात हे होणार असल्याचं म्हटलं होतं असंही ते म्हणाले. “महाराजांनी स्वराज्याची स्थापन केल्यानंतर काही ठिकाणी गनिमी कावा आणि तह केला होता. राजकारणात या गोष्टी कराव्याच लागतात. उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. प्रत्येक सुख आणि दु:खात ते सहभागी होत असतात. ते नेहमी चांगलं मार्गदर्शन करत असतात. या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या असून पुढेही घालत राहू. सरनाईक कुटुंबाला नेहमी त्यांचा आशीर्वाद मिळत असतो,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.