तब्बल १७०० कोटींचा खर्च आणि पाच वर्षांपासूनची गैरसौय लादून मुंबईकरांच्या स्वप्नातील मोनोरेल प्रत्यक्षात धावण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. गुलाबी, निळ्या आणि हिरव्या रंगाची मोनो रेल नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुतन वर्षाचे औचित्य साधून भारतातील पहिली मोनोरेल सुरू करावी या उद्देशाने मुंबई मोनोरेलचा पहिला टप्पा जानेवरी २०१४ पासून सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
मोनो आपत्कालीन चाचणीतून पार
चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मोनोरेल प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सुरक्षा प्रमाणपत्राची प्रक्रिया आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात या मार्गाची पाहणी होऊन मोनोरेलला हे सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे.मोनोरेल स्थानकांसाठी युद्धपातळीवर ‘सॅटिस’ची लगबग!
पहिल्या टप्प्यात मोनोरेलची सेवा चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरू होणार आहे. नंतर दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या ११.२ किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल सुरू होईल.
मोनोरेल सुरळीत धावण्यासाठी १६ कोटी रूपये खर्च करणार
मोनोरेल सुरू करण्यापूर्वी त्यास सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक आहे. या सुरक्षाविषयक तपासणीसाठी महाराष्ट्र सरकारने माजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नेमणूक सुरक्षा प्रमाणपत्र प्राधिकरण (अभियंता) म्हणून केली आहे. त्यानुसार मोनोरेलला हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने सर्व कागदपत्रांसह शुक्रवारी अर्ज दाखल केला. मोनोची स्थानके, त्यावरील उपकरणे, वीजपुरवठा, कारडेपोची माहिती, सिग्नल यंत्रणा, अग्निशमन व्यवस्थेसह इतर सुरक्षा यंत्रणा आदींची तपशीलवार कागदपत्रे अर्जासोबत सादर करण्यात आली आहेत
*सकाळी ५ ते मध्यरात्री १२ या वेळेत मोनो धावेल.
*चेंबूर ते वडाळा हे सरासरी पाऊण तासांचे अंतर मोनोरेलमुळे अवघ्या १९ मिनिटांत कापता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2013 रोजी प्रकाशित
नूतन वर्षी ‘मोनो रेल’ धावण्यास सज्ज!
तब्बल १७०० कोटींचा खर्च आणि पाच वर्षांपासूनची गैरसौय लादून मुंबईकरांच्या स्वप्नातील मोनोरेल प्रत्यक्षात धावण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत.

First published on: 30-12-2013 at 12:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Single line connection indias first monorail set for opening in mumbai in the new year