राज्यातील सहा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने सोमवारी जारी केले आहेत. त्यामध्ये के. व्यंकटेशम यांची नागपूरला पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे पोलीस आयुक्त एस. पी यादव यांची अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर बदली करण्यात आली आहे.
रविंद्र सिंघल यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून, सध्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) या विभागात बदली करण्यात आली आहे. केंद्रीय नियुक्तीवरून परत आलेले यशस्वी यादव यांची ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर ठाण्यात या पदावर कार्यरत असलेले मकरंद रानडे यांची ठाण्यातच अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) या पदावर बदली करण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाने सोमवारीच या बदल्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2016 रोजी प्रकाशित
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नाशिक, नागपूरचे पोलीस आयुक्त बदलले
के. व्यंकटेशम यांची नागपूरला पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-08-2016 at 16:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six ips officers transfer in maharashtra