टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये साप आढळल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे लोकलमधल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळाचं वातावरण झालं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टिटवाळ्याहून ८ वाजून ३३ मिनिटांनी सीएसएमटी लोकल निघाली. लोकल ठाणे स्थानकावर पोहोचली तोपर्यंत कोणाचं लक्ष नव्हतं. पण नंतर एका प्रवाशाचं लोकलमधल्या फॅनकडे लक्ष गेलं आणि त्याने आरडाओरड करत फॅनमध्ये साप असल्याचं इतरांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

थोड्यावेळात एका प्रवाशाने लाकडी पट्टीच्या सहाय्याने सापाला खाली पाडलं आणि लोकलमधून खाली रुळांवर ढकलून दिलं. त्यानंतर लोकल पुढे मार्गस्थ झाली. या गोंधळामुळे काही वेळासाठी लोकल थांबवण्यात आली होती, त्यामुळे त्या लोकलच्या मागच्याही काही लोकल थांबवण्यात आल्या होत्या.

पाहा व्हिडीओ –

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake found in mumbai local at thane station
First published on: 02-08-2018 at 11:44 IST