सवरेत्कृष्ट मंडळाला रुग्णवाहिका भेट मिळणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईसह संपूर्ण राज्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या मंडळांसाठी ‘स्टार प्रवाह’ने आयोजित केलेल्या ‘मंडळ भारी आहे’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा ८ नोव्हेंबर रोजी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रंगणार आहे. अंतिम फेरीत सात मंडळे दाखल झाली असून यातून सवरेत्कृष्ट एका मंडळाची निवड केली जाणार आहे. सवरेत्कृष्ट मंडळास रुग्णवाहिका भेट देण्यात येणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातून ८४ मंडळे सहभागी झाली होती. अंतिम फेरीत दाखल झालेल्या सात मंडळांमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ इचलकरंजी (कोल्हापूर), अशोक मंडळ (दक्षिण मुंबई), शामनगरचा राजा (पश्चिम मुंबई), संस्कृती प्रतिष्ठान (मध्य मुंबई), शिवसम्राट मित्र मंडळ (ठाणे), श्री अष्टविनायक मंडळ (पुणे), सरदार चौक मंडळ (नाशिक) यांचा समावेश आहे. अंतिम फेरीच्या सोहळ्यात ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकांमधील ‘ऋषी व रुंजी’, ‘दुर्वा व केशव’यांचा नृत्याविष्कार, मृणाल ठाकूर, सायली देवधर, स्पर्धेचे सूत्रसंचालक डॉ. अमोल कोल्हे यांचेही विशेष सादरीकरण होणार आहे. क्रांती रेडकर व हेमंत ढोमे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. समाजोपयोगी कामे करणाऱ्या पाच मंडळांचा या वेळी विशेष गौरव केला जाणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरून या सोहळ्याचे प्रसारण होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social motive program on star pravah
First published on: 07-11-2015 at 00:30 IST