मुंबई: मध्य प्रदेशातील इंदूर येथून महाराष्ट्रात येणारी एसटी महामंडळाची एक बस १८ जुलै रोजी नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. एसटीचालक अन्य गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना हा अपघात झाल्याचे महामंडळाने नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ बस नर्मदा नदीत कोसळली होती. यामध्ये दहा प्रवासी, एसटीचा चालक, वाहकाचा मृत्यू झाला होता. अपघाताची एसटी महामंडळाकडून चौकशी करण्यासाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली होती. या समितीचा प्राथमिक अहवाल सादर झाल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus fell into the narmada river in mp while attempting to overtake committee mention in preliminary report mumbai print news asj
First published on: 30-07-2022 at 12:31 IST