मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टी प्रकरणामध्ये रोज नविन खुलासे होत आहेत. एनसीबीच्या कारवाईनंतर नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. कॉर्डेलिया क्रूझप्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा १०० टक्के सहभाग असून वेळ आल्यानंतर सर्वांची नावे जाहीर करणार असल्याचा इशारा भाजपाचे माजी पदाधिकारी मोहित कंभोज यांनी दिला आहे. मंदिरे सात ऑक्टोबर रोजी सुरु झाली मग क्रूझ पार्टीला परवानगी कोणी दिली असा सवालही कंभोज यांनी विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आंतरराष्ट्रीय सीमेवरुन समुद्रात कोणतेही जहाज आले तर त्याची परवानगी सरकार देते. तर ही परवानगी कोणी दिली? महाराष्ट्रामध्ये सात तारखेला मंदिरे उघडली. क्रूझपार्टीला दोन तारखेची परवानगी देण्यात आली. या प्रकरणामध्ये हायप्रोफाईल लोक आहेत. मला असे वाटते की हे एक मोठे सिंडिकेट सहभागी आहे. याची चौकशी व्हायला हवी. परवानगी कोणी दिली, किती रुपयांचा व्यवहार झाला? म्हणून मला वाटत आहे की यामध्ये सरकामधील व्यक्ती सामील आहे. त्याची माहिती माझ्याकडे आणि जिथे द्यायची आहे तिथे देईल,” असे मोहित कम्बोज यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.

तुम्ही मंत्रीमंडळातील ती व्यक्ती असल्याचे ट्विट केले आहे तर ती व्यक्ती कोण आहे असा सवाल केला असता त्यावर कम्बोज यांनी भाष्य केले आहे. “जिथे माहिती द्यायची आहे तिथे माहिती देणार आहे. विनापरवानगी कोणतेही क्रूझ कोणत्या राज्यात येऊ शकत नाही. त्यासाठी परवानगी घेतली असलेच. महाराष्ट्रात मॉल, रेस्टॉरंट २१ तारखेला खुले झाले. धार्मिक स्थळे सात तारखेला खुली झाली. तर क्रूझ पार्टीला परवानगी पाच दिवस आधीच देण्यात आली. त्यामुळे याच्यामध्ये कोणीतरी हायप्रोफाईल व्यक्ती आहे. माझ्याकडे याची माहिती आहे. माध्यमांना ती देणार आहे,” असे मोहित कम्बोज म्हणाले.

“याप्रकरणी तक्रार करून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे की, याच्या तपासासाठी समिती नेमण्याची मागणी करणार आहे. नवाब मलिक आरोप करत आहे आधी त्यांनी स्वतःकडे पाहायला हवं,” असे कम्बोज म्हणाले.

“मी कोणत्याही मंत्र्याकडे इशारा करत नाही आहे. मी सरकारमधील अनेक मंत्री यामध्ये असू शकतात. एनसीबीने पार्टीचे आयोजन करणाऱ्यांना सुद्धा अटक केली आहे. त्यामुळे त्यांचे परवानगीसाठी कोणासोबतरी संबंध असतील. मी याची माहिती देईल. मी राज्यपालांकडे नवाब मलिक यांची तक्रार करणार आहे. आपल्या पदाचा वापर करुन ते आरोप करत आहेत आणि आपल्या जावयाला वाचवत आहेत,” असे कम्बोज म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State ministers involved in cruise party case serious allegations by bjp mohit kamboj abn
First published on: 23-10-2021 at 16:12 IST