जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यक परिषद या सक्षम यंत्रणांनी प्रमाणीकरण केल्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’  औषधाच्या विक्रीला राज्यात परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबा रामदेव यांच्या कंपनीने तयार केलेल्या औषधाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर भारतीय वैद्यक परिषदेने आक्षेप घेतले आहेत. हे औषध करोनावर उपयुक्त असल्याचा पतंजली कं पनीचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने फे टाळला आहे. इतक्या घाईत हे औषध बाजारात आणणे आणि त्याच्या कार्यक्र माला नितीन गडकरी आणि हर्षवर्धन या दोन मंत्र्यांनी उपस्थित राहणे चुकीचे होते. हा सारा गोंधळ लक्षात घेता महाराष्ट्रात पतंजली कंपनीच्या करोनावरील औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State rejected ramdev baba corona medicine abn
First published on: 24-02-2021 at 00:18 IST