मुंबई : राज्यात इंटरनेट ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागही याबाबतीत मागास राहिलेला नसून मागील पाच वर्षांत इंटरनेट ग्राहकांची संख्या ७३ लाखांनी वाढली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षापासून ते २०२४-२५ पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
१५,३७९ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडल्या आहेत.
२०२५ पर्यंत अर्बन महानेटद्वारे ३८२३ ठिकाणे जोडण्यात आली आहेत. यामुळे ग्रामीण भागात इंटरनेट ग्राहकांची संख्या वाढली़ २०१९-२० साली २.६७ कोटी असलेली इंटरनेट ग्राहकांची संख्या पाच वर्षांत ३.४० कोटींवर.
शहरी भागातही इंटरनेट ग्राहकांची संख्या वाढली असून २०१९-२० साली ६.६७ कोटींवरून २०२४-२५ सालात ती ७.६५ कोटींवर पोहोचली.
भ्रमणध्वनीधारक घटले
राज्यातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या ४७.४२ लाखांवरून तीन वर्षांत ५३.९९ लाख झाली आहे. भ्रमणध्वनी धारकांची संख्या २०२२-२३च्या तुलनेत १२ कोटी ५८ लाखांवरून २०२४-२५च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत १२ कोटी ५६ लाख झाली आहे. याचा अर्थ दोन लाखांनी भ्रमणध्वनीधारक घटले आहेत. एमटीएनएल, बीएसएनएलच्या तुलनेत रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे