scorecardresearch

Premium

मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न

नरिमन पॉइंट परिसरातील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Suicide attempt Ministry mumbai
मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : नरिमन पॉइंट परिसरातील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या भावाची हत्या झाली असून त्याप्रकरणी संशयितांची नावे देऊनही त्यांना अटक झाली नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला व्यक्तीला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : मार्केट यार्डातील आंबा महोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; कोकणातील १२ शेतकऱ्यांचे मोबाईल लंपास

shiv sena ubt leader assault bmc official in in mulund
मुंबई: पालिका अधिकाऱ्याला शिवसेनेच्या शाखा प्रमुखाकडून मारहाण
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात
bribe for the release of Aryan Khan
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचे प्रकरण : ईडीने दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी समीर वानखडे उच्च न्यायालयात
Karanja port first phase work
करंजा बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, सुविधा पुरविणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंना उडवणार आहे”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील एक जण अटकेत

अशोक चौरे (५०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी मंत्रालयाच्या गार्डन मुख्यालयाजवळ अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले. चौरे पुण्यातील बाणेर येथे राहतात. जालना येथील रामसगावमधील ते मुळ रहिवासी आहेत. त्यांचा भाऊ काशिनाथ चौरे (४४) यांची हत्या झाली होती. त्याप्रकरणी अशोक चौरे यांनी सहा संशयितांची नावे पोलिसांना सांगितली होती. पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे आपण आत्महत्याचे प्रयत्न केल्याचे चौरे यांनी चौकशीत सांगितले. त्यांना फौजदारी दंड संहिता कलम ४१ (अ) (१) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suicide attempt in front of ministry entrance in mumbai mumbai print news ssb

First published on: 11-04-2023 at 11:32 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×