scorecardresearch

Premium

सनी देओलच्या जुहूतील बंगल्याचा लिलाव, ५६ कोटींची थकबाकी, बँकेकडून लिलावाची जाहिरात

अभिनेता सनी देओलचा गदर २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असताना दुसरीकडे सनी देओलने कर्जापोटीच्या ५६ कोटींची परतफेड केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Sunny Deol Juhu bungalow
सनी देओलच्या जुहूतील बंगल्याचा लिलाव, ५६ कोटींची थकबाकी, बँकेकडून लिलावाची जाहिरात (फोटो : सोशल मीडिया)

मुंबई : अभिनेता सनी देओलचा गदर २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असताना दुसरीकडे सनी देओलने कर्जापोटीच्या ५६ कोटींची परतफेड केली नसल्याची माहिती समोर आली आहे. ५६ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहूतील बंगल्याचा लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २५ सप्टेंबरला हा लिलाव होणार आहे.

हेही वाचा – “नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…”; ठाकरे गटाकडून मोठी ‘ऑफर’

man kidnapped for marriage hyderabad
फोटो पाहून प्रेम, लग्नासाठी व्यावसायिक महिलेनं केलं मुलाचं अपहरण; गुन्हा दाखल
After Shreyas Iyer was ruled out of Ranji Trophy 2024 due to back pain, the NCA made waves the next day by declaring him fit.
Ranji Trophy 2024 : रणजीपासून दूर राहण्यासाठी श्रेयसची पाठदुखीची खोटी तक्रार? एनसीएकडून पूर्णपणे तंदुरुस्त घोषित
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Three accused of defrauding a businessman in Borivali of 10 crores arrested Mumbai news
बोरिवलीमधील व्यवसायिकाची १० कोटींची फसवणूक; तीन आरोपी अटकेत

हेही वाचा – “केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई?” मनसेनं व्यक्त केली शंका

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. जुहू येथील सनी व्हिला नावाचा बंगला त्यासाठी तारण ठेवण्यात आला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओल यांनी केली नसून ५६ कोटींची रक्कम थकविली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ५१ कोटी ४३ लाख रुपये अशी बोली लावण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunny deol juhu bungalow auctioned mumbai print news ssb

First published on: 20-08-2023 at 17:39 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×