केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. आज ते पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विलेपार्ले येथे पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०० भाग ऐकतील. दरम्यान, यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाहांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. खोपोलीतील शिवप्रबोधन यात्रेनंतर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Bhiwandi Building Collapsed: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; ९ जखमी, दहा-बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“अमित शाहांनी दिल्ली ते मुंबई येणं-जाणं करण्यापेक्षा एकादाचा मुंबईत दोन बीएचके फ्लॅट घेऊन टाकावा. एका रुममध्ये त्यांनी राहावं आणि दुसऱ्या रुममध्ये पंतप्रधान मोदांनी राहावं. सारखं सारखं अपडाऊन करू नये. मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीसाठी इतक्या फेऱ्या मारण्याची गरज नाही”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली. मुंबई महापालिका कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर विश्वास ठेवत आली आहे. यापुढेही मुंबई महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच भगवा फडकेल, असेही त्या म्हणाल्या.

“…म्हणून मोदींना असं बोलावं लागतं”

पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्र सोडलं. कर्नाटकमधील रॅलीत बोलताना काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या, असं विधान पंतप्रधान मोदी यांना केले होते. यासंदर्भात बोलताना, “शिव्या देणं ही भाजपाची संस्कृती आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य काँग्रेसला शिव्या देण्यातच गेलं. त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे ते असंच बोलत राहतील”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा – “यशोमती ठाकुरांना हनुमान चालिसा आवडत नसेल, तर…”; बाजार समितीच्या निकालावरून केलेल्या ‘त्या’ टीकेला रवी राणांचं प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितेश राणेंना लगावला टोला

दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला होता. उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र रचत होते, असं ते म्हणाले होते. यावरून सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना टोला लगावला. राणेंची दोन्ही मुलं विद्वान आहेत. त्यांच्याबद्दल आपण बोलू नये, असं त्या म्हणाल्या.