स्वाइन फ्लूने शुक्रवारी मुंबईत आणखी चार जणांचा मृत्यू झाला. यात तीन जण मुंबईतील, तर एक जण मुंबईबाहेरील रुग्ण आहे. केईएम व नायर रुग्णालयासह दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या रुग्णांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूने मरण पावलेल्या रुग्णांची मुंबईतील एकूण संख्या आता २८ झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी स्वाइन फ्लूचे ६९ रुग्ण नव्याने आढळून आले. यातील दोन रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.