मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्ती कामानिमित्त ९ मे रोजी बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भातील कामाच्या नियोजनाची माहिती दिली होती. त्यानुसार, विमानाच्या वेळापत्रकाचे नियोजित वेळापत्रक तयार केले आहे. यातून मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

हेही वाचा – म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण

मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनासह मुंबई विमानतळ प्रशासन मान्सूनपूर्व कामे करणार आहे. ९ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तास धावपट्टी व धावपट्टीच्या बाजूला असलेल्या दिव्यांची दुरुस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल यांसारखी प्रमुख कामे या कालावधीत केली जातील.