मुंबई : अनुवांशिकता हे कर्करोगाचे एक कारण आहे. अनुवांशिक कर्करोगाच्या रुग्णांचे निदान लवकरात लवकर होऊन त्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी टाटा रुग्णालयाकडून अनुवांशिक समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्राद्वारे टाटा रुग्णालयाकडून रुग्णांचे, त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी टाटा रुग्णालय व विन्झो या कंपनीमध्ये करार झाला आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्ण व त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे कर्करोगाचे लवकर निदान करण्याला टाटा रुग्णालयाकडून प्राधान्य दिले जाते.

२००० ते २०१९ या कालावधीत भारतात जवळपास १ कोटी लाख भारतीयांचा २३ प्रकारच्या कर्करोगांमुळे मृत्यू झाला. २०२२ मध्ये जगभरात २ कोटी कर्करोगाचे नवे रुग्ण आढळले तर ९ कोटी ७० लाख रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन कर्करोग रुग्णांची संख्या २०५० पर्यंत ३ कोटी ५० लाख होण्याची शक्यता आहे. गेल्या २० वर्षांत कर्करोग प्रतिबंध, उपचार व पॅलिएटिव्ह केअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. यातही अनुवांशिक समुपदेशानाच्या माध्यमातून कर्करोगाचा धोका कमी करण्यात यश येत आहे. त्यामुळे टाटा रुग्णालयाने अनुवांशिक समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विन्झो या कंपनीशी करार करण्यात आला आहे.

हेही वाचा – बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा

या करारानुसारअनुवांशिक समुपदेशन केंद्र उभारण्यासाठी निधी उभारला जाणार आहे. हा निधी टाटा रुग्णालयातील ॲडवान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरईसी)ला देण्यात येणार आहे. या निधीचा वापर रुग्णालयातील अनुवांशिक समुपदेशन तुकडीला प्रशिक्षित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये अनुवांशिक समुपदेशनासाठी कौशल्य विकास, गुणसूत्रांची तपासणी आणि कौटुंबिक समुपदेशानावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.अनुवांशिक समुपदेशनाच्या प्रशिक्षणातून समुपदेशाकांमध्ये विशेष कौशल्य विकसित करून कर्करोग प्रतिबंध, जागरूकता व लवकर निदान करण्यासाठी मदत होणार आहे. याचा लाभ विविध सामाजिक-आर्थिक घटकातील नागरिकांना होणार आहे.

हेही वाचा – बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्करोग अनुवांशिक समुपदेशक हे रुग्णांचे वेळेवर, संवेदनशीलपणे आणि वैयक्तिकरित्या समुपदेशन करतील. टाटा रुग्णालयाला मिळणाऱ्या निधीतून उपकरणे आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यासाठी उत्तमरित्या प्रशिक्षित तज्ज्ञांच्या तुकडीची गरज यामुळे भागवण्यास मदत होणार असल्याचे टाटा रुग्णालयातील कॅन्सर जेनेटिक्स क्लिनिक्स आणि कॅन्सर जेनेटिक्स/जीनोमिक्स लॅबचे प्रमुख डॉ. राजीव सरिन यांनी सांगितले.