मुंबई : पावसाळी वातावरणामुळे मुंबई आणि परिसरातील तापमानात गेल्या दोन-तीन दिवसांत मोठे चढ-उतार नोंदविण्यात आले आहेत. मुंबईच्या तापमानात बुधवारपाठोपाठ गुरुवारीही मोठी घट नोंदविण्यात आली. गुरुवारी कुलाबा येथे २५.८ तर सांताक्रूझ येथे २६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमानात ७ अंशांची घट नोंदविण्यात आली. बुधवारीही त्यात आठ अंशांची घट नोंदविण्यात आली होती. मंगळवारी सांताक्रूझ येथे ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शहर आणि उपनगरांतील किमान तापमानात गुरुवारी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ४ आणि १ अंशांची घट झाली. डहाणू येथे किमान १८.६ अंश सेल्सिअस, तर कमाल २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ९१.२ मिमी आणि कुलाबा येथे ९०.२ मिमी पावसाची नोंद झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature in mumbai dropped sharply mumbai temperature zws
First published on: 03-12-2021 at 01:28 IST