scorecardresearch

दुर्दैवी; खेळताना विहिरीत पडलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू, दोन तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले होते यश

दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाला या मुलाला बाहेर काढण्यात यश आले होते

Thane 10 year old boy falls into well in Nalpada area

ठाणे येथील नळपाडा परिसरात राहणारा साहील जयस्वाल (१०) हा परिसरात खेळत असताना लहान विहिरीत पडल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाला या मुलाला बाहेर काढण्यात यश आले.

नळपाडा परिसरात असलेल्या अष्टविनायक मैदानाजवळ सायंकाळी साहिल खेळत होता. खेळत असताना तो ३५ फुट खोल असलेल्या लहान विहिरीत तोल जाऊन पडला. याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्याचे शोधकार्य सुरु केले. अखेर दोन तासाच्या अवधीनंतर साहिलला बाहेर काढण्यात पथकाला यश आले असून त्याला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान या मुलाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane 10 year old boy falls into well in nalpada area abn 97 tlsp 0122

ताज्या बातम्या