नियमांना मान्यता नाही म्हणून रद्द करावी लागलेली मुंबई विद्यापीठाची ‘पेट’ ही पीएचडी प्रवेश परीक्षा आता ३० मे रोजी घेण्यात येणार आहे. साधारणपणे दीड ते दोन हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतात. बायोटेकची जीआरएफ परीक्षा ‘क्लॅश’ होण्यापासून संबंधित परीक्षेच्या सुधारित नियमांना (व्हीसीडी) मान्यता नाही, अशा विविध कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलली गेल्याची चर्चा आहे. अखेर ३० मे रोजी जुन्याच नियमांनुसार ही परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ‘नव्या नियमांना मान्यता नाही, मात्र परीक्षा फार लांबविणे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. त्यामुळे, ही परीक्षा लवकर घेणे आवश्यक होते,’ असे एका प्राध्यापकांनी सांगितले.
परीक्षेसाठी या पूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना नव्याने नोंदणीची गरज नाही. परंतु, नोंदणी न केलेल्या उमेदवारांना १७ मेपर्यंत नोंदणी करता येईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना अर्ज डाऊनलोड करता येईल. हा अर्ज १२९ क्रमांकाच्या थिसीस सेंटरमध्ये भरून द्यायचा आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
‘राज्य सेवा पूर्व परीक्षे’मुळे (एमपीएससी) मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आपल्या १८ मे रोजी होणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. परीक्षा केंद्रांमध्ये आणि वेळेमध्ये कोणताही बदल नाही.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2013 रोजी प्रकाशित
पीएचडी पात्रता परीक्षा आता ३० मे रोजी
नियमांना मान्यता नाही म्हणून रद्द करावी लागलेली मुंबई विद्यापीठाची ‘पेट’ ही पीएचडी प्रवेश परीक्षा आता ३० मे रोजी घेण्यात येणार आहे. साधारणपणे दीड ते दोन हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतात. बायोटेकची जीआरएफ परीक्षा ‘क्लॅश’ होण्यापासून संबंधित परीक्षेच्या सुधारित नियमांना (व्हीसीडी)
First published on: 15-05-2013 at 02:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The phd qualifying exam on may