सनदी अधिकाऱ्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओशिवरा येथील मीरा टॉवर या इमारतीतील एका सदनिकेमध्ये चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणले. आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या या इमारतीत रात्री नऊच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून केलेल्या कारवाईत पाच वेश्यांना अटक केली. या तरुणी मालिकांमधून कामे करणाऱ्या पाच मॉडेल्स असल्याचे समजते. या वेश्यांबरोबरच एका खासगी कंपनीचा व्यवस्थापक व दलाल या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. मीरा टॉवर या इमारतीतील बी विंगमधील १४०२ क्रमांकाची ही सदनिका एका व्यावसायिक महिलेच्या नावावर आहे. या महिलेने पुण्यातील सॉफ्टकॉन सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका खासगी कंपनीला ती भाडय़ाने दिली होती. या कंपनीचा व्यवस्थापक इम्तियाझ शेख या सदनिकेमध्ये हे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. ही सदनिका ‘गेस्ट हाऊस’प्रमाणे वापरली जात होती. त्यासाठी पाच हजार रुपये घेतले जात होते, असे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2013 रोजी प्रकाशित
सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतीतील सेक्स रॅकेट उघडकीस
सनदी अधिकाऱ्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओशिवरा येथील मीरा टॉवर या इमारतीतील एका सदनिकेमध्ये चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणले. आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या या इमारतीत रात्री नऊच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून केलेल्या कारवाईत पाच वेश्यांना अटक केली. या तरुणी मालिकांमधून कामे करणाऱ्या पाच मॉडेल्स असल्याचे समजते.
First published on: 21-06-2013 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sex racket expose in chartered officials building