बाणगंगेजवळ असलेल्या मंदिरांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेलं हे मंदिर दगडी बांधकामांचं आहे. बाकिची मंदिरं विटांची आहेत. दख्खनी शैलीत बांधलेलं हे अठराव्या शतकातलं सिद्धेश्वर शिव मंदिर आहे. असं मानलं जातं की हे मंदिर मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकावणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांनी बांधलं आहे. रघुनाथराव पेशवे नंतर इंग्रजांच्या पेन्शनवर मुंबईत मलबार हिलवर राहिले होते असे गॅझेटियरमध्ये संदर्भही आहेत.
आत्ता राजभवन आहे तिथं उंच मनोरा असलेल्या वास्तूत राघोबादादा राहिल्याचंही सांगितलं जातं. हे मंदिर कोकणातल्या अन्य मंदिरांशी विसंगत असून पुणे किंवा देशावरील मंदिरांप्रमाणे दख्खनी शैलीतील असल्यामुळे राघोबादादांनी बांधलेलं असू शकेल, पण तसा ठोस पुरावा नाहीये.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.