मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने कार दुभाजक तोडून मुंबईकडे जाणाऱ्या डिझेल ट्रकला धडकली आहे. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, डिझेल ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे. अरुणकुमार पारेख, असं कार चालकाचं नाव आहे. खानिवडे पुलाजवळ हा अपघात झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पारेख गुजरातकडे जात होते. तेव्हा त्यांच्या कारच्या उजव्या बाजूचं टायर फुटलं. नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ कार दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूला गेली. तेव्हा समोरून येणाऱ्या डिझेल ट्रक चालकाला कार दिसल्यावर त्याने दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न केला. पण, कार ट्रकच्या मागील बाजूला धडकली. तर, डिझेल भरले असल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “उधार-उसणेवारी करुन एक…”

मांडवी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रफुल्ल वाघ यांनी सांगितलं की, “पारेख कारमध्ये एकटेच होते. कारचे टायर पूर्णपणे खराब झालं होतं. पारेख यांच्यावर कलम ३०४ आणि १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third fatal accident on mumbai ahmedabad highway claims gujarat man ssa
First published on: 03-02-2023 at 11:59 IST