उपनगरी रेल्वेच्या एक, तीन आणि पाच दिवसांच्या ‘पर्यटन’ तिकीट भाडय़ामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तात्काळ करण्यात आली असून २५ ते ३५ रुपयांपर्यंत ही वाढ झाली आहे.उपनगरी तिकिटांच्या भाडय़ात वाढ झाल्यानंतर, प्रवाशांना पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गाने प्रवास करण्यासाठी रेल्वेकडून देण्यात आलेल्या या विशेष ‘पर्यटन’ तिकिटांचे दर वाढणे स्वाभाविक होते. त्यानुसार दुसऱ्या वर्गाचे तिकीट एक दिवसासाठी ७५ रुपये, तीन दिवसांसाठी ११५ रुपये तर पाच दिवसांसाठी १३५ रुपये असे भाडे आकारण्यात येत आहे. तर प्रथम वर्गासाठी एक दिवसाला २५५ रुपये, तीन दिवसांसाठी ४१५ रुपये तर पाच दिवसांसाठी ४८५ रुपये भाडे आहे. दुसऱ्या वर्गाचे भाडे २५ रुपयांनी तर प्रथम वर्गाचे भाडे ३५ रुपयांनी वाढले असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist ticket cost increase by 25 to
First published on: 25-01-2013 at 03:03 IST