मुंबई : मुंबईमध्ये ठिकठिकाणी एक हजार २५, तर रेल्वेच्या हद्दीत १७९ महाकाय फलक उभे आहेत. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील हे अनेक ठिकाणी फलकांसाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेमालुमपणे छाटणी करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करून वृक्षांचा बळी घेतला जात आहे.

मुंबईतील मुख्य रस्ते, उड्डाणपूल, इमारतींच्या आवारात महाकाय फलक उभारण्यात आले आहेत. त्यावर झळकविण्यात येणाऱ्या जाहिराती दूरवरून दृष्टीस पडाव्यात यासाठी बराच आटापीटा करण्यात येतो. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी, दुभाजकांवर लावण्यात आलेली झाडे बहरतात आणि त्यामुळे जाहिरातींचे फलक झाकोळले जातात. त्याचबरोबर पदपथांवर बहरलेले वृक्षही या फलकांना अडथळा निर्माण करतात. वृक्षांच्या अडथळ्यामुळे फलकांवरील जाहिराती दूरवरून दिसत नाहीत. त्यामुळे फलक दिसण्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची वारंवार छाटणी करण्यात येते. पावसाळ्यात रस्त्यालगतचे, खासगी भूखंडावरील व वृक्ष बहरतात. अशा वृक्षांच्या मुळावर आता फलक उठले आहेत. काही वृक्षांच्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येते.

Ghatkopar collapse
Ghatkopar Hoarding Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता!
pre-trial, Metro 3, Aarey, Dadar, mumbai metro rail corporation
मेट्रो ३ : आरे – दादरदरम्यान मेट्रो गाड्या धावू लागल्या, एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात
Deliberate delay in redevelopment of 120 slum
१२० झोपड्यांच्या पुनर्विकासाला हेतुतः विलंब
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Mumbai Ghatkopar Hoarding Accident Update BMC Issues Notice
घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगविषयी BMC चा मोठा खुलासा; परवानगी कुणी दिली, खरा दोष कुणाचा?
fire broke out while cutting the giant board at the petrol pump
मुंबई : महाकाय फलक कापताना दुर्घटनाग्रस्त पेट्रोल पंपावर आग
Narendra Modi
“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत

आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – दादरदरम्यान मेट्रो गाड्या धावू लागल्या, एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात

वृक्षांवर विषप्रयोग

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पदपथावर वृक्षारोपण करण्यात येते. काही वर्षांतच वृक्ष मोठे होतात. डेरेदार वृक्ष लगतच्या इमारतींमधील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यांवरील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरतात. वृक्षांच्या फांद्या खिडकी, सज्जापर्यंत पोहोचतात. तसेच दुकानदारांनाही हे वृक्ष नकोसे होतात. वृक्षांमुळे दुकानावरील पाटी, जाहिरात ग्राहकांच्या नजरेआड होते. त्यामुळे चुना अथवा अन्य रासायनिक द्रव्याचे पाणी खोडाजवळ टाकण्यात येते. काही वेळा खोडावर छिद्र करून इंजेक्शनच्या साह्याने वृक्षामध्ये रासायनिक द्रव्य सोडले जाते. यामुळे वृक्ष सुकत जातो आणि मरणपंथाला लागतो. अशा प्रकारे मुंबई अनेक ठिकाणी वृक्षांनी मान टाकली आहे.