मुंबई:  मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शनिवारी आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन संचलन कार्यक्रमास मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सर्व उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute martyrs of 26 11 attacks martyred mumbai police force officer employees mumbai news ysh
First published on: 27-11-2022 at 00:02 IST