मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणते मुंबई शहराला पाणी पुरवठा करणा-या महत्त्वाच्या तलावांपैकी एक असलेल्या तुळशी तलावाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत समाधानकारक पाऊस होत असल्याने तलावाच्या पातळीत वाढ झाली आहे. रात्रभर मुंबईत पाऊस कोसळत असल्याने मंगळवारी सकाळपासूनच तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. असे म्हणतात ८ हजार दक्षलक्ष लिटर इतकी क्षमता असलेला हा तलाव मुंबईतल्या सातही तलावांआधी भरतो. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने या तलावाने तळ गाठला होता. परंतु आता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2016 रोजी प्रकाशित
Tuslshi lake overflow: तुळशी तलाव दुथडी भरून वाहू लागला
मंगळवारी सकाळपासूनच तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 19-07-2016 at 11:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuslshi lake overflow