मुंबई : बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांनी येस बँकेची १२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोन गुन्हे दाखल केले आहेत. येस बँकेच्या तक्रारीवरून छाब्रिया यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)  गेल्याच महिन्यात येस बँक – डीएचएफएल फसवणुकीप्रकरणी छाब्रिया यांना अटक केली होती.  छाब्रिया रेडियस इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट व रघुलीला बिल्डर्स प्रा. लि.चे संचालक आहेत. येस बँकेच्या वतीने गणेश श्रीधर वारंग यांच्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी ते आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहेत. ओव्हरड्राफ्ट व मुदत कर्ज प्रकरणात हे गुन्हे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.  ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून घेतलेली रक्कम बुडवून येस बँकेचे ३० कोटी ३९ नुकसान केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात संजय छाब्रिया यांच्यासह रितू छाब्रिया, जीतेन उतवानी, दीपक बजाज व इतर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार रेडियस इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्टच्या संचालकांनी कंपनीची खरी आर्थिक माहिती लपवली. त्यामुळे येस बँकेने ३० कोटी ३९ लाख रुपयांची ओव्हर ड्राफ्ट सुविधा दिली. ती रक्कम इतर कामासाठी वळती करून बँकेची रक्कम बुडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दुसऱ्या गुन्हा येस बँकेकडून घेण्यात आलेल्या मुदत कर्जासंदर्भातील आहे. संजय छाब्रिया यांच्यासह रितू छाब्रिया यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two charges against builder sanjay chhabria yes bank accused embezzling ysh
First published on: 21-05-2022 at 02:07 IST