मुंबईः युट्यूबवरील व्हिडिओ ‘लाईक’ करण्याच्या नावाखाली महिला फॅशन डिझानरची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे.

सुमित गुप्ता (३६) व पार्थ पांचाळ (२५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुप्ता कांजूरमार्ग येथील, तर पांचाळ हा बदलापूर येथील रहिवासी आहे. ४६ वर्षीय तक्रारदार महिला विलेपार्ले येथील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी ७ एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार महिलेला दिव्या नावाच्या मुलीने संदेश पाठवला होता. युट्युबवर मार्केटिंगचे काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमीष तिने दाखवले होते. त्याला होकार दिल्यानंतर तक्रारदार महिलेला एक लिंक प्राप्त झाली. त्याद्वारे तिला टेलिग्राम चॅनेलवर समाविष्ट करण्यात आले. तक्रारदार महिलेने व्हिडिओ लाईक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर सुरूवातीला काही रक्कम जमा झाली. त्यामुळे विश्वास संपादन करून तिने आणखी फायदा हवा असल्यास ई-वॉलेटद्वारे गुंतवणुकीचे आमीष दाखवले. आरोपीने तक्रारदार महिलेला ३० ते ४० टक्के नफा देण्याचे आश्वासन देऊन या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. तक्रारदार महिलेने पैसे गुंतवले आणि आभासी खात्यामध्ये तिला नफाही झालेला दिसत होता.

sanjog waghere property detail in election affidavit
मावळ : मुलाला एक कोटी कर्ज, पत्नीला ९७ लाख ‘हातउसने’, संजोग वाघेरेंची किती आहे संपत्ती…
supriya sule file nomination
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; अजित पवार, प्रतिभा पवारांनाही कर्जपुरवठा
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

हेही वाचा… जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष अद्ययावत होणार

मात्र, जेव्हा तिने वॉलेटमधून तिच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. त्यानंतर तिने आरोपीला याबाबत विचारणा केली. त्यांनी तिला सांगितले की तिच्या टास्कमध्ये काही त्रुटी होती. ती पूर्ण केली आणि आणखी रक्कम ई-वॉलेटमध्ये भरल्यास ही रक्कम मिळेल. त्यानंतर तक्रारदार महिलेना आणखी रक्कम भरली. पण त्यानंतरही पैसे हस्तांतरित होत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. पण तोपर्यंत तिने १० लाख ६७ हजार रुपये भरले होते. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींच्या खात्यावर फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. यापूर्वी पांचाळला फसवणुकीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनीही अटक केली होती. आरोपींच्या खात्यातील सहा लाख रुपये गोठवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.