मुंबई : गिरगाव चौपाटी येथे शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. निवासी इमारतीत लागलेली ही आग विझवण्यात पहाटे अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर इमारतीत दोन मृतदेह आढळले. नलिनी शाह (८२ वर्ष) आणि व हिरेन शाह (६० वर्ष) अशी त्यांची नावे आहेत.

गिरगाव चौपाटी येथील रांगणेकर मार्गावर असलेल्या गोमती भवन इमारतीत शनिवारी साडेसातच्या सुमारास ही आग लागली होती. तीन मजल्याच्या या इमारतीत व तिसऱ्या मजल्याच्यावर एक पोटमाळा काढण्यात आला होता. त्यात तिसऱ्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती. ही आग काही मिनिटांतच पसरली. घराच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. अग्निशमन दलाने लगेचच बचावकार्य हाती घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Gadchiroli, Wild Elephant Attack, Gadchiroli Wild Elephant Attack, women dies in Wild Elephant Attack, Wild Elephant Attack women dies, bhamaragad, Hidur Village, marathi news, Wild Elephant Attack, Gadchiroli news, Wild Elephant in Gadchiroli, bhamaragad news, Hidur Village news,
गडचिरोली : हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेचाही मृत्यू; आतापर्यंत तिघांचे बळी
uncle rapes 18 Yr old niece in panvel
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक
gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार

हेही वाचा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर धावणार १२ विशेष लोकल; कसे असेल वेळापत्रक? वाचा

हेही वाचा – मुंबई : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक, वडाळा व कुरार येथील घटना

विद्युत पुरवठा बंद करून अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या नऊ जणांना बाहेर काढले. रात्री दहा वाजता अग्निशमन दलाने ही आग स्तर दोनची असल्याची वर्दी दिली होती. इमारतीतून बाहेर काढलेल्या लोकांकडून आत कोणी अडकले आहे का याबाबत माहिती घेतली जात होती. त्यामुळे आत दोन जण अडकल्याचे समजले होते. ज्या घरात आग लागली होती त्या घरात अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रवेश केला असता झोपण्याच्या खोलीत मृतदेह आढळला तर स्नानगृहात एक मृतदेह आढळून आला. हे दोन्ही मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत होते. हे दोन्ही मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.