Mumbai Local News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी जमा होते. महामानवास अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी भारतासह जगभरातून लाखो अनुयायी येत असतात. दरम्यान, ही लाखोंची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष १२ गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामुळे महामानवाचे महापरिनिर्वाणदिनी दर्शन सोपे होणार आहे.

मध्ये रेल्वेने ५ आणि ६ डिसेंबर (मंगळवार- बुधवार) मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेलदरम्यान १२ विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

mumbai, Central Railway, 28 Additional Summer Special Trains, Mumbai and Gorakhpur, 28 Additional trains, Additional Special trains, summer special trains, mumbai news,
मुंबई-गोरखपुर दरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
duronto express 60 lakh cash found marathi news
लांबपल्ल्यांच्या रेल्वेत सापडली ६० लाखांची रोकड
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

Dr. Ambedkar Marathi Quotes: महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरांचे 9 विचार मनी रुजवून, शेअर करून वाहा आदरांजली

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कसे असणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक ? (Mahaparinirvan Diwas Central Railway Time Table)

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला-परळ विशेष ही गाडी रात्री १२.४५ वाजता कुर्ल्याहून रवाना होणार आहे आणि परळ येथे रात्री ०१.०५ वाजता पोहोचेल.

कल्याण- परळ विशेष गाडी कल्याणहून रात्री ०१.०० वाजता रवाना होईल आणि परळ येथे ०२.१५ वाजता पोहोचेल.

ठाणे-परळ विशेष गाडी ठाण्याहून रात्री ०२.१० वाजता रवाना होईल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.

परळ-ठाणे विशेष गाडी परळहून रात्री ०१.१५ वाजता रवाना होईल आणि ठाण्याला ०१.५५ वाजता पोहोचेल.

परळ-कल्याण विशेष गाडी परळहून रात्री ०२.२५ वाजता रवाना होईल आणि कल्याणला ०३.४० वाजता पोहोचेल.

परळ-कुर्ला विशेष गाडी परळहून रात्री ०३.०५ वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०३.२० वाजता पोहोचेल.

वाशी-कुर्ला विशेष गाडी वाशीहून रात्री ०१.३० वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.

पनवेल-कुर्ला विशेष गाडी पनवेलहून सकाळी ०१.४० वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.

वाशी-कुर्ला विशेष गाडी वाशीहून रात्री ०३.१० वाजता रवाना होईल आणि कुर्ला येथे दुपारी ०३.४० वाजता पोहोचेल.

कुर्ला-वाशी विशेष गाडी कुर्ल्याहून रात्री ०२.३० वाजता रवाना होईल आणि वाशीला ०३.०० वाजता पोहोचेल.

कुर्ला-पनवेल विशेष गाडी कुर्ल्याहून रात्री ०३.०० वाजता रवाना होईल आणि पनवेलला ०४.०० वाजता पोहोचेल.

कुर्ला-वाशी विशेष गाडी कुर्ल्याहून रात्री ०४.०० वाजता रवाना होईल आणि वाशीला ०४.३५ वाजता पोहोचेल.

मुंबई-नागपूरदरम्यान विशेष रेल्वेच्या १० अनारक्षित फेऱ्या, महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचे नियोजन

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.