scorecardresearch

Premium

मुंबई : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक, वडाळा व कुरार येथील घटना

वडाळा पूर्व येथे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली.

people arrested for sexually abusing children
मुंबई : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक, वडाळा व कुरार येथील घटना (image – pixabay/representational image)

मुंबईः वडाळा पूर्व येथे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत मालाड पूर्व येथे सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी २२ वर्षांच्या आरोपीला अटक केली.

मुलगी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने एका कारखान्यात नेऊन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी २३ वर्षांच्या आरोपीला राहत्या परिसरातून अटक केली.

Suicide of minor married girl funeral was done mutual case was registered after two months
अल्पवयीन विवाहित मुलीची आत्महत्या; अंत्यविधी परस्पर उरकला; दोन महिन्यांनी गुन्हा दाखल
mumbai municipal corporation marathi news, mumbai 48000 illegal hoardings marathi news
मुंबईत गेल्या वर्षभरात ४८ हजार बेकायदा फलकांवर कारवाई, गुन्हा मात्र २२ प्रकरणांतच; कारवाईतील तफावतीवर उच्च न्यायालयाचे बोट
vasai police marathi news, vasai serial rapist marathi news
अखेर ‘तो’ सिरीयल रेपिस्ट गजाआड, वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा २ ने सुरत येथून केली अटक
akola crime news, father killed his son akola marathi news
धक्कादायक! दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले; बनाव रचला, पण पोलीस तपासात…

हेही वाचा – अंधेरीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरूच

हेही वाचा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर धावणार १२ विशेष लोकल; कसे असेल वेळापत्रक? वाचा

पीडित मुलीवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. आरोपी पीडित मुलीच्या परिचयाचा आहे. त्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलीला कारखान्यात घेऊन गेला होता. दुसऱ्या घटनेत सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली. याबाबतची माहिती पीडित मुलाच्या आईला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two people arrested for sexually abusing children incidents at wadala and kurar mumbai print news ssb

First published on: 03-12-2023 at 21:18 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×