आहे. या समितीने १५ दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई विद्यापीठातील सुविधांच्या विरोधात प्राध्यापक नीरज हातेकर आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी विद्यापीठाने अखेर एक समिती स्थापन केलीकुलगुरुनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या गैरसोयींसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ गाजत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी कालिना कॅम्पसमध्ये एकदिवसीय उपोषणालाही बसले होते. त्यानंतर आता विद्यापीठ प्रशासन जागे झाले असून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय शेटय़े यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि इतर अनेक त्रुटी लक्षात घेता काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. हे उपोषण इतर अनेक कारणांनी गाजलेही होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या या २८ मागण्यांची दखल घेत कुलगुरू डॉ. वेळुकर यांनी गुरुवारी रात्री उशीरा ही समिती स्थापन
केली.
या समितीमध्ये अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी, प्रदीप सावंत, डॉ. उर्वशी पंडय़ा, डॉ. प्रिशिला पॉल, डॉ. किशोर गायकवाड आणि अविनाश ठाकरे यांचा समावेश आहे.
या समितीने संकुलातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून विद्यापीठाकडे १५ दिवसांत अहवाल सादर करायचा आहे.
शारीरिक शिक्षणाच्या प्रश्नासाठी आज बठक
गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचा प्रश्न सोडविण्यासाठी कुलगुरुंनी शनिवारी तातडीची बठक कालिना येथील आंबेडकर भवनात बोलविली आहे. दुपारी १२ वाजता होणाऱ्या या बठकीत प्रकुलगुरू डॉ. नरेशचंद्र, कुलसचिव एम. ए. खान, विद्यापीठ व महाविद्यालये विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजपाल हांडे, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख, अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी आणि विद्यार्थ्यांना निमंत्रित केले आहे.