Devendra Fadnavis Office Vandalizes: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मुलाखती व त्यातून त्यांनी मांडलेल्या राजकीय भूमिकांबाबत चर्चेत आहेत. मात्र,एकीकडे देवेंद्र फडणवीस क्लिष्ट अशा राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत असताना दुसरीकडे थेट मंत्रालयात त्यांच्याच कार्यालयाबाहेर एका महिलेचा असंतोष पाहायला मिळाला. एका अज्ञात महिलेनं मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असून त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला मंत्रालयाचा अभ्यागतांसाठी असणारा पास न काढताच आत गेल्याचं सांगितलं जात आहे. सचिव गेटमधून ही महिला मंत्रालयात गेल्याची प्राथमिक माहिती असून तिनं थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरच तिचा असंतोष अशा रीतीने प्रगट केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. या महिलेचं काही काम प्रलंबित राहिल्यामुळे तिनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील आपला संताप अशा रीतीने व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

Devendra Fadnavis: “…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “हे सगळं राजकीय…”

फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची पाटी काढली!

दरम्यान, या महिलेनं मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची पाटी काढून टाकली व तिथे घोषणाबाजी केली. तसेच, आरडाओरडा करत काही काळ फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गोंधळही घातला. मात्र, त्यानंतर ती महिला मंत्रालयातून निघून गेली. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Dharmaveer 2 Release: “धर्मवीर ३’ ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांकडून शोध सुरू

दरम्यान, सदर महिला नेमकी मंत्रालयात पास नसतानाही शिरली कशी? कोणत्याही सुरक्षा कर्मचारी वा अधिकाऱ्याने या महिलेला का हटकलं नाही? थेट देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर जाऊन या महिलेनं आपला राग का व्यक्त केला? तिचं कोणतं काम प्रलंबित होतं? सगळा प्रकार झाल्यानंतर ही महिला कुठे गेली? ही महिला नेमकी कोण होती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात असून त्यासंदर्भात पोलीस सविस्तर तपास करत आहेत.