वसई: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील वर्सोवा पूल दुरुस्तीचे  काम पुढे ढकलण्यात आले आहे.  दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल रविवार २६ ते मंगळवार २८ सप्टेंबर असे तीन दिवस बंद ठेवण्यात येणार होता. मात्र दुरूस्तीचे काम पुढे ढकलण्यात आल्याने आता हा पूल वाहतुकीसाठी नियमित सुरू राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील जुना वर्सोवा पूल आहे. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी २६ ते २८ सप्टेंबर असे तीन दिवस बंद करण्यात येणार होता. या काळात पुलावर एकच मार्गिका खुली ठेवून  अवजड वाहनांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची  गैरसोय होणार होती.  मात्र ठाणे शहरातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे झाल्याने व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दुरूस्तीचे काम हाती घेतल्यास वाहतूक कोंडीत अधिक भर पडेल त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम  पुढे ढकलण्यात यावे अशी विनंती ठाणे शहर वाहतूक विभागाने केली होती. ही अडचण लक्षात घेता आय.आर.बी. सुरत यांनी वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम ८ ते १० दिवस पुढे ढकलली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Versova bridge repair work postponed akp
First published on: 26-09-2021 at 01:28 IST