ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून रविवारी सांगण्यात आले. छातीत संसर्ग झाल्याने दिलीपकुमार यांना शनिवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांना अतिदक्षता विभागात नव्हे तर विशेष खोलीत ठेवण्यात आले असल्याची माहितीही कुटुंबीयांकडून देण्यात आली. ९१ वर्षीय दिलीपकुमार यांना सर्दीमुळे छातीत कफ साठल्याने त्रास होऊ लागला होता. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2014 रोजी प्रकाशित
दिलीपकुमार यांची प्रकृती स्थिर
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून रविवारी सांगण्यात आले. छातीत संसर्ग झाल्याने दिलीपकुमार यांना शनिवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
First published on: 08-12-2014 at 04:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor dilip kumar admitted in hospital now stable