टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेता मोहन भंडारी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.
मोहन यांची प्रकृती गेले काही वर्ष ठीक नव्हती. त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता. दूरदर्शन वाहिनीवरील ‘खानदान’ या प्रसिद्ध मालिकेव्यतिरीक्त त्यांनी ‘कर्ज’, ‘परंपरा’, ‘जीवन मृत्यू’, ‘पतझड’, ‘गुमराह’ या मालिकांमध्येही काम केले आहे. आमिरच्या ‘मंगल पांडे- द रायझिंग स्टार’ या चित्रपटातही ते झळकले होते. ‘तेरे शहर मे’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला त्यांचा मुलगा ध्रुव याने आपल्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती काही महिन्यांपूर्वीच दिली होती.
८०च्या दशकात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, १९९४ मध्ये ते टीव्ही मालिकांपासून दुरावले. त्यानंतर त्यानी ‘सात फेरे’ या मालिकेने पुनरागमन केले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Sep 2015 रोजी प्रकाशित
अभिनेते मोहन भंडारी यांचे निधन
टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेता मोहन भंडारी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 25-09-2015 at 12:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran tv actor mohan bhandari passes away