रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह बरीच नावे चर्चेत होती. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून विद्या चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार श्रीमती विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. डॉ. फौजिया खान यांनी आज विद्या चव्हाण यांना नियुक्ती पत्र दिले. महिला संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी विद्या चव्हाण जोमाने काम करतील, असा विश्वास फौजिया खान यांनी व्यक्त केला.

फौजिया खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी यांची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya chavan appointed as women state president of ncp hrc
First published on: 05-05-2022 at 15:35 IST