scorecardresearch

मुंबई : भ्रष्टाचारूपी रावणाचे दहन

राजकारणी, कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने होणाऱ्या भ्रष्टाचारुपी रावणाचे दहन करण्यात येणार आहे.

मुंबई : भ्रष्टाचारूपी रावणाचे दहन
वॉचडॉग फाऊंडेशनने दसऱ्याच्या दिवशी भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा निर्णय घेतला आहे ( संग्रहित छायचित्र )

विविध ठिकाणच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे नवरात्रौत्सवात नऊ रंगात रंगविल्यानंतर वॉचडॉग फाऊंडेशनने दसऱ्याच्या दिवशी भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणी, कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने होणाऱ्या भ्रष्टाचारुपी रावणाचे दहन करण्यात येणार आहे.
पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांकडे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाचडॉग फाऊंडेशनने गेले नऊ दिवस आंदोलन केले होते.

हेही वाचा >>> ‘ब्रम्हास्त्र’ची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच ; कमाई ४०० कोटीच्या पल्याड

नऊ दिवस खड्डयांना नऊ रंगात रंगवून अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे खड्डे बुजवले. या आंदोलनाची सांगता दसऱ्याच्या दिवशी होणार असून या दिवशी भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी पूर्व येथे सहार गाव परिसरात भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे.निकृष्ट दर्जाची रस्ते बांधणी आणि खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. तसेच रस्त्याच्या कामांवर देखरेख ठेवली जात नाही, निकृष्ट कामासाठी कोणाला जबाबदार धरले जात नाही, असाही आक्षेप संस्थेने घेतला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या