राज्यातील भाजप सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असून येत्या अधिवेशनात कायद्यातील त्रृटी दूर करून मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत टीकविण्याचे प्रयत्न केले जातील, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी असल्याचे ते म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत राज्यसरकार मराठा आरक्षण टीकविण्यासाठी प्रयत्न करेल आणि नागपूर अधिवेशनात कायद्यातील त्रृटी दूर करून योग्य बदल केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर,  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे यांनीही मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.