सिद्धिविनायकाच्या दर्शनाने ममता बॅनर्जींनी केला मुंबई दौऱ्याचा ‘श्री गणेशा’!

सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी साधला संवाद, म्हणाल्या…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या आहेत. त्यांनी आज आपल्या दौऱ्याची सुरूवात करण्या अगोदर श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मागे जेव्हा मी मुंबईत आले होते तेव्हा इथे येण्यास जमलं नव्हतं. त्यामुळे मी यंदा दर्शनास जाण्याचं ठरवलं होतं. आमच्या घरी देखील गणपती पूजा होते. मी मंदिर समितीची, पुजाऱ्यांची आणि महाराष्ट्र शासनाची आभारी आहे. मी सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. मला अतिशय छान वाटलं. इतक्या चांगल्याप्रकारे या लोकांनी मला दर्शन घडवण्यासाठी व्यवस्था केली. मी अतिशय आनंदी आहे, जय मराठा.. जय बांगला… ”

ममता बॅनर्जी – उद्धव ठाकरे यांची भेट होणार नाही ; आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर होणार चर्चा!

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जींचा हा राजकीय चर्चांचा विषय देखील ठरत आहे. कारण, दिल्लीत नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आता, या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत.

शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे देखील त्यांचे नियोजन होते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West bengal cm and tmc chief mamata banerjee visited siddhivinayak temple msr