मुंबई : पश्चिम रेल्वेवरील पालघर-बोईसरदरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी रविवारी दोन तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील बोईसर – वसई रोड मेमू आणि डहाणू रोड – बोरिवली मेमू रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ८.३० ते सकाळी १०.३० दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या मेमू रविवारी रद्द

– सकाळी ८.३५ ची बोईसर – वसई रोड मेमू

– पहाटे ४.५५ ची डहाणू रोड – बोरिवली मेमू

या रेल्वेगाड्या रखडणार

जामनगर – तिरूनेलवेली एक्स्प्रेस, भुज – वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, भगत की कोठी – वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, जोधपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, अजमेर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ब्लॉकमुळे रखडणार आहेत.

सकाळी ९.३० वाजता विरार – डहाणू रोड लोकल पालघर स्थानकादरम्यान २० मिनिटे थांबविण्यात येणार आहे.

१३ जुलै रोजी अंशत: रद्द असलेल्या रेल्वेगाड्या

– सकाळी ५.४९ वाजता डोंबिवलीवरून सुटणारी बोईसर मेमू वसई रोडपर्यंत चालवण्यात येईल. ही मेमू वसई रोड – बोईसर स्थानकादरम्यान रद्द केली जाईल.

– सकाळी ७.२० ची बोरिवली- वलसाड मेमू बोरिवलीऐवजी डहाणू रोड स्थानकातून सकाळी ९ वाजता सुटेल. तर, बोरिवली – डहाणू रोड दरम्यान मेमू सेवा रद्द करण्यात येईल.

– सकाळी ५.५२ ची चर्चगेट – डहाणू रोड लोकल पालघरपर्यंत धावेल. त्यामुळे पालघर – डहाणू रोड स्थानकांदरम्यानची लोकल सेवा उपलब्ध नसेल. तर, सकाळी ८.३५ वाजता डहाणू रोड – बोरिवली धावणारी लोकल पालघरवरून सकाळी ९.०९ वाजता बोरिवलीसाठी धावेल. त्यामुळे डहाणू रोड – पालघरदरम्यानची लोकल रद्द असेल.

– सकाळी ७.११ ची चर्चगेट – डहाणू रोड लोकल पालघरपर्यंत धावेल. त्यामुळे पालघर – डहाणू रोड स्थानकांदरम्यानची लोकल सेवा उपलब्ध नसेल. तसेच सकाळी ९.३७ वाजताची डहाणू रोड – विरार लोकल सेवा, डहाणू रोडवरून न सुटता पालघरवरून सकाळी १०.०९ वाजता सुटेल. त्यामुळे डहाणू रोड – पालघर लोकल सेवा रद्द असेल.

– सकाळी ७.४२ ची चर्चगेट – डहाणू रोड लोकल केळवे रोडपर्यंत चालवण्यात येईल. त्यामुळे केळवे रोड – डहाणू रोडदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सकाळी १०.२५ ची डहाणू रोड – चर्चगेट लोकल डहाणू – केळवे रोडदरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. –