लांब पल्ल्याच्या एका रिकाम्या गाडीच्या इंजिनामागील डबा परळ यार्डातून महालक्ष्मी स्थानकाकडे येताना रात्री ९.५२ च्या सुमारास घसरल्याने पश्चिम रेल्वेवरील डाऊन धिम्या मार्गावरील उपनगरी वाहतूक शुक्रवारी रात्री विस्कळीत झाली. बोरिवलीच्या दिशेकडे जाणारी उपनगरी वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आली. मात्र त्यामुळे डाऊन जलद मार्गावरील लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी वाहतुकीवरही परिणाम झाला.