Who is Bhavesh Bhinde : मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर सोमवारी वाऱ्यामुळे महाकाय जाहिरात फलक कोसळला. त्याखाली शेकडो नागरिक अडकले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ झाली आहे. रेल्वे पोलीस प्रशासनाच्या जागेवर हा पेट्रोल पंप असून तेथे जाहिरात फलक लावण्यात आला होता. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा फलक लावणारे भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर ३०४,३३८,३३७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पंतनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भावेश भिंडे सध्या बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर भावेश भिंडे कोण हे पाहुयात.

कोण आहेत भावेश भिंडे?

मुंबईत काल (१३ मे) अचानक वादळी वारे वाहू लागले. सर्वत्र धुळ पसरली होती. वाऱ्याचा वेग ६० किमी प्रतितास होता. परिणामी घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेला होर्डिंग कोसळला. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हे याच कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shabana Azmi On Kangana Ranaut Slap Row
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण: शबाना आझमी म्हणाल्या, “या घटनेनंतर खुश झालेल्या लोकांच्या गर्दीत…”
sanjay raut on cisf constable kulwinder kaur
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण; संजय राऊत म्हणाले, “मला त्यांच्याबद्दल सहानुभूती, मात्र…”
bombay high court verdict on bar owners plea against excise department action
पोर्शे घटनेच्या परवाना निलंबन कारवाईला आव्हान; ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीच्या ड्रमबीटसह बारमालकांना दिलासा नाहीच
Celebrity Candidates Who Won Lok Sabha Polls Kangana Ranaut Hema Malini Arun Govil Manoj Tiwari
कंगना रणौत, हेमा मालिनी ते अरुण गोविल! लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सेलिब्रिटींचं काय झालं?
panvel Electricity consumers
पनवेल: अखंडीत वीज समस्येसाठी वीजग्राहक, महावितरण कंपनीच्या अधिका-यांची तळोजात बैठक
maha vikas aghadi workers cheering after victory
मतमोजणीस्थळी मविआचा जल्लोष, महायुतीची निराशा; अंबड येथील मतमोजणी केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांचा जल्लोष
sheet metal on Nashik Municipal Corporations signboards in dangerous condition
नाशिक महानगरपालिकेच्या पथदर्शक फलकावरील पत्रे धोकादायक स्थितीत, गडकरी चौकात पत्रे कोसळले
Pune accident
Pune Accident : अपघात झाल्यानंतर विशाल अगरवाल यांचे आमदार सुनील टिंगरेंना ४५ मिस्डकॉल्स, फोन रेकॉर्डवरून धक्कादायक माहिती समोर

भावेश भिंडे बेपत्ता?

भावेश भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं मुंबई पोलीस सोमवारी रात्री त्यांच्या मुलुंड येथे राहत्या घरी पोहोचले. परंतु, भावेश भिंडे तेथे सापडले नाहीत. तसंच, त्यांचा मोबाईलही बंद असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >> Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; LIVE VIDEO समोर!

बीएमसीने काय सांगितलं?

मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनास्थळी चार होर्डिंग्स होत्या. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी/एनओसी एजन्सी/रेल्वेकडून घेण्यात आली नव्हती.”

बिलबोर्ड बांधणाऱ्या M/S Ego Media या एजन्सीविरुद्धही तक्रार नोंदवण्यात आली होती व बीएमसीसुद्धा त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली होती. बीएमसी जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.

हेही वाचा >> घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगविषयी BMC चा मोठा खुलासा; परवानगी कुणी दिली, खरा दोष कुणाचा?

बीएमसी आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, “हे एक बेकायदेशीर होर्डिंग होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रेल्वेच्या जमिनीवर चार होर्डिंग उभारण्यात आले होते आणि त्यापैकी एक कोसळले आहे. बीएमसी वर्सभरापासून होर्डिंग्ज लावण्यावर आक्षेप घेत होती.यापूर्वी १९ मे २०२३ ला संबंधित होर्डिंगसाठी छेडा नगर जंक्शनजवळील आठ झाडांना पावडर घालून विषबाधा करत पाडण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी सुद्धा बीएमसीने एफआयआर दाखल केली होती. “

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेलं होर्डिंग

दुर्घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक निवेदन जारी करून हे जाहिरात फलक त्यांच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. BMC ने जारी केलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती. हे होर्डिंग सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोठे असून याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद केली गेली होती.