Mumbai Rains Ghatkopar hording collapse:  मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे. असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.

पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेट्रोल पंपाजवळील फलक मुळाशी असलेले लोखंडी खांब मोडून जमिनीवर आदळला. या दुर्घटनेच्या ध्वनीचित्रफिती काही मिनिटांतच समाजमाध्यमांवर फिरू लागल्या. पाऊस पडत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या परिसरात अनेक वाहनचालक, पादचारी आडोशासाठी उभे होते. त्यांच्यावरच हा महाकाय फलक कोसळल्यामुळे अनेक जण गाडले गेले. हे दृश्य अतिशय भीषण होते. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बीपीसीएल, महानगर गॅस आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या प्राधिकरणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशीरापर्यंत मदतकार्य सुरू होते. फलक लोखंडी असल्याने क्रेनशिवाय बाजूला करणे अथवा उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे बराच वेळ मदतकार्य सुरूच होऊ शकले नाही. याच दरम्यान किरकोळ मार लागलेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. यावेळी दबलेले अनेकजण मदतीची याचना करत होते. मदतीसाठी होर्डींगच्या खालून येणारे आर्त आवाज हेलावून टाकणारे होते.

nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Vasai, fake police, keychain,
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग
Punerkar boy marriage biodata viral
Photo: “पोरगी कसली पण असुदे फक्त…” पुणेकर तरुणानं लग्नाच्या बायोडेटात लिहली अशी अपेक्षा; बायडेटा पाहून पोट धरुन हसाल
panama evacuate its first port
‘या’ देशातील संपूर्ण बेटच जाणार समुद्राखाली; ३०० कुटुंबांचे करणार स्थलांतर, कारण काय?
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..

बघ्यांची मोठी गर्दी

पूर्व द्रुतगती मार्गाला लागूनच पेट्रोल पंप असल्याने घटना घडल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. चालकांनी रस्त्यालगत वाहने थांबविल्याने बराच वेळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटना पाहण्यासाठी बाजूला असलेल्या लोकवस्तीमधून नागरिक धावल्याने गर्दीत भर पडली. अखेर पोलिसांनी सर्वांना बाजूला केल्यानंतर मदतकार्य सुरु झाले.

फलकाला परवानगी कुणाची?

फलक असलेली जागा मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या नावे आहे. फलक उभे करण्यासाठी आपण कार्यभार स्वीकारण्यापूर्वी परवानगी देण्यात आली होती, असा दावा लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केला. फलकाला परवानगी कुणाच्या अखत्यारित देण्यात आली, याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच, जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा >> मुंबईत धुळीच्या वादळाचं तांडव; पेट्रोल पंपावर ५ सेकंदात कोसळलं लोखंडी होर्डिंग, लोकांच्या किंकाळ्या अन्…VIDEO व्हायरल

दरम्यान, भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात कलम ३०४, ३३८, ३३७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली घटनास्थळाला भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर येथील घटनास्थळाला रात्री उशिरा भेट दिली. “घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्देवी अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली तसेच मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. एनडीआरएफ आणि प्रशासन अतिशय गतीने काम करीत आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश आपण आधीच दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

“या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे. या घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.