डोंबिवलीकरांचा लोकल प्रवास हा रोज जीव मुठीत धरुनच होतो. काही दिवसांपूर्वीच चार्मी पासड नावाची एक २२ वर्षांची मुलगी डोंबिवलीच्या पुढेच असलेल्या कोपर स्टेशनजवळ लोकलमधून पडल्यामुळे झाला होता. लोकलमधली खच्चून गर्दी, ऑफिस अवर्सच्या वेळात धावणाऱ्या फास्ट लोकल्समध्ये पाय ठेवायला जागाही नसणं, धीम्या गतीच्या लोकलमध्येही चढायला न मिळणं. या डोंबिवलीकरांच्या रोजच्याच समस्या आहेत. अगदी सकाळी पावणेसहाला येणाऱ्या पहिल्या फास्ट लोकललाही मरणाची गर्दी असते. बरं डोंबिवलीत लोकलमध्ये चढायला मिळणं हेच एक दिव्य असतं. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, लेडिज डबा सगळीकडे एकच चित्र दिसतं ते असतं गर्दीचं. ही गर्दी का होते? डोंबिवलीकरांचा जीव का जातो? लोकलमधून पडून प्रवासी जखमी का होतात? त्याचा आढावा या व्हिडीओतून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ता ऑनलाईनने केला आहे. पाहा हा व्हिडीओ रेल्वेतून पडून का मरतात डोंबिवलीकर?