पोलिसांनी जेव्हा छापा घातला तेव्हा १७ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी त्यांना सापडली. विशेष म्हणजे तिची १२वीची परीक्षाही सुरू आहे. तिच्या शाळेपासूनच्या जीवलग मैत्रिणीने तिला या व्यवसायात आणले होते. ती मध्यमवर्गीय मराठमोळया कुटुंबातली होती. दोन तासाचे ५ हजार रुपये मिळतील म्हणून ती तयार झाली. पण पहिल्याच दिवशी पोलिसांच्या छाप्यात सापडली. जी मुलगी एकदा व्यवसायात आली ती अनेक मुलींना आपल्यामागे आणत राहते. वर्मा पब्जमध्ये नियमित जात असे. तेथील उच्च वर्गातल्या मुली, महाविद्यालयीन तरुणींनाही या जाळ्यात आणत असे. पैशाच्या लालसेपटी आणि परिस्थितीला बळी पडून मुली या व्यवसायात कशा ओढल्या जात होत्या त्याचे भीषण वास्तव वर्माच्या माध्यमातून उघड झाले आहे.

मुलींचीच तपासणी का?
चर्चगेट रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या चांगल्या पेहरावातील पुरुष प्रवाशांना सहसा तिकिट तपासनीस अडवत नाहीत. पण चांगल्या कपडय़ातल्या आणि सुंदर दिसणाऱ्या मुलींना हमखास अडवले जाते. त्यातून विकृतीही दिसून येते. याच पद्धतीने वर्मा मुलींना अडवून सावज जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

10th Board Exam Topper Heer Ghetiya Dies
१० वीला ९९.७० टक्के मिळवणाऱ्या हीरचा निकालानंतर चार दिवसातच मृत्यू; वडिलांचा निर्णय वाचून मन हळहळेल
arrest Class XI student elopes with her father friend in Nagpur
अकरावीच्या विद्यार्थिनीचे वडिलांच्या मित्रासोबत पलायन; अपहरणकर्त्याला गोंदियातून अटक
A young man died in a two wheeler accident mumbai
दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
Nagpur, girl Abuse, Lover absconded,
नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार
Mumbai, Sexual assault,
मुंबई : बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पित्याला अटक
boy was molested, molest,
१० वर्षांच्या मुलावर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, दुसरा मुलगा अल्पवयीन
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?
Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती

रेल्वे अनभिज्ञ का?
मरिन लाइन्स या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरील सरकारी क्वॉटर्समध्ये राजरोस देहव्यापार चालत होता. तेथील सुरक्षा रक्षक आणि रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांना हा प्रकार माहिती नसणे शक्यच नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एरवी सर्वसामान्य माणूस रेल्वेच्या जागेत दिसला तरी त्याला त्वरीत हटकणाऱ्या रेल्वे प्रशासनाला वर्माच्या सरकारी निवासस्थानात शेकडो मुली आणि येणारी गिऱ्हाइके  कशी दिसत नव्हती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्माला ‘पिटा’ कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून  त्याला सध्या पश्चिम रेल्वेने बडतर्फ केले आहे, अशी माहिती तपास अधिकारी दिलीप कुलकर्णी यांनी दिली.