म्हाडाच्या सोडतीचे वेळापत्रक अनिश्चित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून मुंबईकर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या प्रतीक्षेत असून गोरेगावमधील पहाडी परिसरात सुरू असलेले इमारतींचे बांधकाम फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीमध्ये पहाडी येथील तब्बल २६०० सदनिकांचा समावेश होईल. मात्र ही सोडत नेमकी कधी काढण्यात येणार हे निश्चित नाही.  मुंबईत गृहनिर्मितीसाठी म्हाडाकडे मोकळी जागा नसल्याने भविष्यात इमारतींच्या पुनर्विकासावरच अवलंबून रहावे लागणार आहे. सध्या मंडळाचे काही ठिकाणी गृहप्रकल्प सुरू असून पडाडी, गोरेगाव येथील म्हाडाच्या भूखंडावरील गृहप्रकल्प हा त्यापैकीच एक मोठा प्रकल्प. मात्र या जमिनीवर कुसुम शिंदे नामक महिलेने मालकी हक्काचा दावा केनंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. जवळपास २५ वर्षे म्हाडाने न्यायालयीन लढा दिला आणि न्यायालयीन लढाई जिंकून २०१६ मध्ये हा भूखंड मिळविला. त्यानंतर या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यात आले व गृहप्रकल्पाचा आराखडा तयार करुन गृहनिर्मितीस सुरुवात करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Year round waiting houses mhada ysh
First published on: 18-01-2022 at 01:04 IST