झिका आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासांची शोधमोहीम पालिकेने हाती घेतली होती. मात्र दहा दिवसांची शोधमोहीम व त्यानंतरही सुरू असलेल्या नियमित चाचणीदरम्यान या डासांची संख्या मर्यादित आढळल्याने मुंबईला सध्या तरी झिकाचा धोका नसल्याने पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना हायसे वाटले आहे.
झिका विषाणूंबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व महापालिकांना सूचना केली होती. त्यानंतर मुंबईत तातडीने एडिस इजिप्ती डासांची शोधमोहीम सुरू करण्यात आली. पालिकेने सव्वादोन लाख घरांची पाहणी केली तसेच पाण्याची दोन लाखांहून अधिक पिंपे तपासली. मात्र दोन लाख घरांमधून केवळ २०४ घरांमध्ये ३२७ ठिकाणी एडिस इजिप्ती डास आढळले.
३९ देशांमध्ये पसरलेल्या झिका विषाणूंचा सामना करण्यासाठी जूनपर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख डॉलरची गरज लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2016 रोजी प्रकाशित
झिकाचा मुंबईला धोका नाही..
झिका आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासांची शोधमोहीम पालिकेने हाती घेतली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-02-2016 at 02:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zika virus