२४ तासांत ९ मृत्यू, १५० नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात दिवसभरात ९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर नवीन १५० रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, २४ तासांत  केवळ २ हजार ५७८ चाचण्या झाल्या. यामध्ये शहरातील २ हजार ३९९, ग्रामीणच्या १७९ अशा एकूण २ हजार ५७८  चाचण्यांचा समावेश आहे.   नवीन बाधितांत शहरातील १३०, ग्रामीण १७, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण १५० रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ३ हजार ७०८, ग्रामीण २६ हजार ७३, जिल्ह्य़ाबाहेरील ८३८ अशी एकूण १ लाख ३० हजार ६१९ रुग्णांवर पोहचली आहे. दिवसभरात शहरात ४, ग्रामीण २, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ९ रुग्ण दगावले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ६९९, ग्रामीण ७२६, जिल्ह्य़ाबाहेरील ६५६ अशी एकूण ४ हजार ८१ रुग्णांवर पोहचली आहे.

२४ तासांत शहरात ३४६, ग्रामीण ४८ असे एकूण ३९४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ९८ हजार २८, ग्रामीण २४ हजार ५५० अशी एकूण १ लाख २२ हजार ५७८ व्यक्तींवर पोहचली आहे. नवीन बाधितांहून करोनामुक्त वाढल्याने जिल्ह्य़ातील  उपचाराधीन  रुग्णांची संख्याही कमी होऊन ३ हजार ९६० रुग्णांवर आली आहे. त्यात शहरातील २ हजार ९८१, ग्रामीणचे ९७९ रुग्णांचा समावेश आहे.   एकूण रुग्णांत ८२५ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर ३ हजार १३५ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

 

विदर्भातील मृत्यू

(१८ जानेवारी)

जिल्हा                    मृत्यू

नागपूर                      ०९

वर्धा                           ००

चंद्रपूर                        ०१

गडचिरोली                  ००

यवतमाळ                   ०१

अमरावती                    ०१

अकोला                       ००

बुलढाणा                      ००

वाशीम                        ००

गोंदिया                        ००

भंडारा                          ०२

एकूण                         १४