News Flash

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३० जणांना अटक

वस्तीतील लोकांनी अचानकपणे पोलिसांवर दगडफेक करून हल्ला केला

(संग्रहित छायाचित्र)

दहांना पोलीस कोठडी, २० जणांची कारागृहात रवानगी

नागपूर : अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पोलिसांवर हल्ला करण्याची घटना सोमवारी संध्याकाळी राहाटेनगर झोपडपट्टी परिसरात घडली. या घटनेत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यापासून ते साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ३० जणांना अटक केली. त्यापैकी दहा जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून २० जणांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

सोमवारीही परिसरात अजनी पोलीस अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेले असताना वस्तीतील लोकांनी अचानकपणे पोलिसांवर दगडफेक करून हल्ला केला. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर शहरातील पोलीस आयुक्त व सर्वच पोलीस उपायुक्त आणि जवळपास ४०० ते ५०० पोलीस कर्मचारी अधिकारी तेथे पोहोचले. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून लोकांना शांत केले. त्यानंतर पोलिसांवर हल्ला करणाऱ्यासाठी भडकावणाऱ्या ३० जणांना अटक केली. त्यांना मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता १० जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर उर्वरित २० जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुणाल संजय लखोटे, निखिल गजाजन टिपले, सोनू राजेंद्र पाटील, नयन वासुदेव हावरे, अल्ताफ प्रकाश लोंढे, अनिकेत रवींद्र पात्रे, प्रवीण माणिक लोंढे, पंकज रामजीवन सरोज, कन्ना कल्लू हातागडे, श्रावण वामन नाडे, आकाश प्रकाश नाडे, धीरज वसंता शेंडे, वतन रतन नाडे, ईश्वार दाजीबा लोंढे, संदीप खुशाल मानकर, दारासिंग जयसिंग लोंढे, वसंता बहादूर लोंढे, सोहन लहू उफाडे, सावन खुशाल मानकर, कैलास अजाबराव हातागडे, प्रताप बकाराम हातागडे, उमेश सुखदेव मानकर आणि इतरांचा समावेश आहे.

दरम्यान, या घटनेत  तीन महिला गृहरक्षक जखमी झाल्या. प्रिया रामाजी निाकेडे, शिल्पा सुरेश मेंढे, भाग्यश्री मनोहर डोडेवार अशी जखमींची नावे आहेत.

४३ जणांवर अवैध दारूविक्रीची कारवाई

या परिसरात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालतो. पोलिसांनी ही कारवाई करताच स्थानिक लोक भडकले व त्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी ४३ जणांविरुद्ध अवैध दारू विक्री कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:02 am

Web Title: arrested for attacking police
Next Stories
1 उत्परिवर्तित विषाणूमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक
2 आदिवासी भागात प्राणवायू ‘कॉन्सनट्रेटर’ संजीवनी ठरतोय
3 प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला ‘नो हॉर्न डे’
Just Now!
X