२४ तासांत ५७ मृत्यू; नवीन ५,९९३ रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ५७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर नवीन ५ हजार ९९३ रुग्णांची भर पडली. नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ३६ रुग्णांवर पोहोचली आहे.

नवीन रुग्णांमध्ये शहरातील ३ हजार ६१३, ग्रामीण २ हजार ३७५, जिल्ह्याबाहेरील ५ अशा एकूण ५ हजार ९९३  रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या २ लाख २३ हजार ९१६, ग्रामीण ७२ हजार ८, जिल्ह्याबाहेरील १ हजार ११२ अशी एकूण २ लाख ९७ हजार ३६ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ३५, ग्रामीण १७, जिल्ह्याबाहेरील ५ अशा एकूण ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ७१२, ग्रामीण १ हजार ३१८, जिल्ह्याबाहेरील ९३० अशी एकूण ५ हजार ९६० रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात शहरात २ हजार ८४८, ग्रामीण १ हजार १४५ असे एकूण ३ हजार ९९३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ८० हजार ५२३, ग्रामीण ४७ हजार ५४८ अशी एकूण २ लाख २८ हजार ७१ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ७६.७८ टक्के आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार पार

शहरात ३९ हजार ३८७, ग्रामीण २३ हजार ६१८ असे एकूण ६३ हजार ५ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ७ हजार ५८२ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये  तर ५५ हजार ४२३ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

नागपूरच्या रुग्णाला अमरावतीला हलवले करोनामुळे वडिलांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. मंगळवारी वर्धमाननगर परिसरातील राधाकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलो. तेथे रुग्णालयाबाहेर तीन तास प्रतीक्षा केली.

पण, रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिला. दुसऱ्या रुग्णालयांमध्येही जागा मिळत नसल्याने वडिलांना घेऊन अमरावतीला गेलो. अमरावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. विलास डोंगरे यांनी एका व्हॉट्सअ‍ॅप समूहावर व्यक्त केली.

२१,५५८ चाचण्या

शहरात दिवसभरात १३ हजार ९२५, ग्रामीण ७ हजार ६३३ अशा एकूण २१ हजार ५५८  चाचण्या झाल्या. मंगळवारी ही संख्या जिल्ह्यात २९ हजार १२२ होती. तांत्रिक कारणाने आरटीपीसीआर चाचण्या कमी असल्या तरी अ‍ॅन्टिजन चाचण्यांची संख्या वाढल्याने ही संख्या अधिक दिसत आहे.